IPL 2021 : यंदा चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात पोहचला तर सॅम करन ‘या’ मालिकेतून घेणार माघार

नवी दिल्ली – यंदा आयपीएलचा चौदावा हंगाम भारतात खेळला जाणार आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने नुकतेच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धेला 9 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे .तसेच या स्पर्धेतील अंतिम सामना 30 मे ला होणार आहे.
त्यामुळे जर चेन्नई सुपर किंग्सचा संघ आंतिम सामन्यात पोहचला. तर मग इंग्लंडचा आष्टपैलू खेळाडू सॅम करण हा न्यूझीलंडविरुध्द होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळणार नाही. कारण आयपीएलचा अंतिम सामना 30 मे ला खेळला जाणार आहे आणि त्याचबरोबर न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 2 जून पासून सुरुवात होणार आहे.
भारताविरुध्द होणाऱ्या टी-20 मालिकेपूर्वी बोलताना सॅम करणने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ”निश्चितपणे आपल्याला हे बघावे लागेल की, आयपीएल कशा पध्दतीने पार पडते. जर आम्ही प्लेऑफसाठी क्वालीफाई करु शकलो नाही. तर कदाचित कसोटी मालिकेसाठी उपलब्ध राहीन.
परंतु जर आम्ही अंतिम सामन्यात पोहचलो, तर मग परिस्थीती वेगळी निर्माण होईल. मात्र सध्या त्याबद्दल विचार करणे योग्य नाही. कारण कोणालाच माहित नाही की, पुढे काय होणार आहे.”
सॅम करनने आईपीएल 2020 बद्दल दिली प्रतिक्रिया –
सॅम करनने मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे आयपीएल 2020 बद्दल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ”मागील वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेनंतर मी एक चांगला खेळाडू बनून समोर आलो आहे. मला बऱ्याच भूमिका निभवायच्या होत्या आणि कित्येक प्रकारची आव्हाने समोर आली. याचा मी आनंद घेतला आणि त्यामुळे माझ्या खेळात खुप सुधारणा झाली.”
सॅम करन पुढे म्हणाला की,त्याला आयपीएल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली त्यासाठी तो आभारी आहे. तो म्हणाला यंदा आयपीएल भारतात होणार आहे. यामुळे आयपीएल 2021 चे महत्व अजूनच वाढले आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा संपुर्ण संघ ( २५ खेळाडू (८ परदेशी) –
एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, जोश हेझलवुड, आर साई किशोर, सॅम करन, रॉबिन उथप्पा, कृष्णप्पा गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, के भागवथ वर्मा, सी हरी निशांथ, एम हरिशंकर रेड्डी.





