प्रभात वृत्तसेवा बारामती – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे व मित्रपरिवार यांच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली.यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक किरण गुजर, माजी उप नगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, राजेंद्र बनकर, किशोर मासाळ अभिजीत चव्हाण, शहराध्यक्ष जय पाटील, अविनाश बांदल, तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, शुभम ठोंबरे, मुख्याधिकारी पंकज भुसे, पोलीस निरीक्षक विलास नाळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सचिन यादव, रामराजे मुळीक, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी हनुमंत पाटील, लहुजी वस्ताद क्रांती सेनेचे पदाधिकारी, मातंग एकता आंदोलनाचे पदाधिकारी, बारामती, इंदापूर, फलटण, दौंड आदी परिसरातून मोठ्या संख्येने अण्णाभाऊ साठे विचार मंचाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अण्णा भाऊ साठे यांचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी व नवीन पिढी शिक्षण क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी विविध उपक्रम जयंतीनिमित्त राबवत असल्याचे बिरजू मांढरे यांनी सांगितले. यावेळी दहावी बारावी व स्पर्धा परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. साईच्या सेवा ट्रस्ट लहुजी वस्ताद दहीहंडी संघ श्रीहरी तेलंगे मित्र मंडळ जय भवानी मित्र मंडळ आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री सावळे पाटील यांनी केले. धनंजय तेलंगे यांनी आभार मानले.