नगर – जिल्हा पोलीस दलातील प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी करोना या संसर्गजन्य आजार नियंत्रीत ठेवण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करुन स्वत:च्या जिवाची काळजी न करता अहोरात्र काम करत आहेत.
जिल्ह्यात (कोविड-19) आजाराचा प्रादुर्भाव् वाढत आहे. या संकटात कर्तव्य बजावतानाही जिल्ह्यातील एका पोलीस निरीक्षकास करोनाची लागण झाली आहे. अशी भयावह परिस्थीती असताना कर्तव्यनिष्ठे मध्ये न डगमगता आपले कर्तव्य पार पाडत असून, समाजाप्रती असलेल्या भावनेतुन लोकहित जपत आहेत. त्याचा प्रत्यय आज पुन्हा शहर पोलिसांमुळे आला.
दत्तात्रेय चिपाडे यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव तेजस चीपाडे यांच्या लग्णाचा अनढव्य खर्चाला फाटा देत गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान यास अकरा हजार रुपये दिले. त्यात प्रतिष्ठान ने 14 हजार टाकून अश्या एकूण 24 हजार रुपयांचा 200 विद्यार्थी करिता शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
तसेच पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली शहरातील गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठाण स्वयंसेवी संस्थेचे हरजीतसिंह वधवा, राजा नारंग, राहुल बजाज, भारत बागरीचा, करण धुप्पर यांचे संयुक्त उपक्रमातुन रामवाडी झोपडपटटी येथील गरवंत कुटुंबीयांतील मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.