मध्यप्रदेशाईल महेश्वरमध्ये सलमानच्या “दबंग 3’चे शुटिंग सुरू झाले आहे. शुटिंगच्या ठिकाणचे फोटो रोजच व्हायरल होत होते. मात्र आता तर एका गाण्याच्या वेळचे डान्सचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. “दबंग 3’मधील तीन गाण्यांचे शुटिंग मध्यंतरी महेश्वरमध्ये झाले. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महेश्वरमधील घाटाच्या किनाऱ्यावर सुमारे 500 डान्सर या शुटिंगसाठी रिहर्सल करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. या गाण्याचे शुटिंग 13 दिवसांमध्ये पूर्ण केले जाणार आहे. हे सगळे तपशील लीक झालेले बघून सलमान खान चांगलाच नाराज झाला.
शुटिंगच्या जागेवर उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सकडून हे शुटिंग लीक केले जात असल्याचे त्याच्या लक्षात आले. हा व्हिडीओ बघितल्यावर लोकांनी सलमान खानला ट्रोल करायला सुरुवात केली. त्याच्या डान्सस्टेप्स हास्यास्पद आहेत, असे लोकांनी चिडवायला सुरुवात केली. काही जण असेही म्हणाले की आता सलमान म्हातारा झाला आहे. “दबंग 3′ यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. डान्स मास्टर प्रभुदेवा हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे तर निर्मिती अरबाझ खान करत आहे.