Salman Khan : ईदनिमित्त सलमान खानचे सरप्राइज! ‘मातृभूमी’ सिनेमाचे गाणं रिलीज
Salman Khan: सलमान खानसोबत चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत

Salman Khan: अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटाची अपडेट समोर आली आहे. ईदच्या खास दिवशी त्याच्या या सिनेमाचं ‘मैं हूं’ हे गाणं प्रदर्शित झाले आहे. सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आगामी सिनेमाच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत सलमान खानसोबत चित्रांगदा सिंह दिसत आहे. ब्लॅक अँड व्हाईटमधीलहे एक भावनिक गाणं आहे. याशिवाय सलमान खानने या सिनेमातील गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. गाण्याचा टीझर शेअर करत त्यानं खास कॅप्शन दिलं आहे.
View this post on Instagram
सलमान खानने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये, ‘Om ooom..Main hooon’ असं लिहिलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये ‘ईद मुबारक भाईजान’ असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
‘मैं हूं’ या गाण्याच्या ओरिजनल वर्जनमध्ये एका सैनिकाच्या परिवाराचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या गाण्यात आनंदाचे क्षण आणि जोडीदारापासून दूर जाण्याचे दु:ख देखील दाखवण्यात आलंय. हे गाणं श्रेया घोषाल आणि अयानलाल यांनी गायले आहे. हे गाणे पाहिल्यानंतर सलमानचे चाहतेही भावुक झाले आहेत. Salman Khan
हेही वाचा :





