सलमान खानच्या 60व्या वाढदिवसाचा जल्लोष; बर्थडे पार्टीसाठी अनेक सेलिब्रिटींची हजेरी

Salman Khan 60th Birthday | बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान 60 वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त रात्री पनवेलच्या फार्महाऊसवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी बॉलीवूडच्या अनेक कलाकरांनी हजेरी लावली होती. ज्याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
सलमान खानने आपल्या 60 व्या बर्थडेची पार्टी पनवेल येथे ठेवली होती. त्याने कुटुंब, मित्रमंडळी, बॉलिवूडमधील काही कलाकारांना आमंत्रण दिले होते. ज्यात क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, देशमुखांची सून जिनिलीया, हुमा कुरेशी, रणदीप हुड्डा, वरुण शर्मा, संगीता बिजलानी, सोहेल खान, रकुल प्रीत सिंह, मनीष पॉल, झीशान सिद्दीकी, मिका सिंग असे अनेक कलाकार पाहायला मिळाले. संगीता बिजलानी ही सलमानची एक्स गर्लफ्रेंड होती.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये सलमानने कॅज्यूल काळ्या रंगाचे टी शर्ट घातले आहे. 60 व्या वर्षी देखील भाईजान फिट आणि हँडसम दिसत आहे. सलमानचा जगभरात चाहता वर्ग आहे. सध्या सोशल मिडीयावर देखील चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची कहाणी जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची आहे. चाहते सलमानच्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहे.
हेही वाचा:
कोल्हापूरात काँग्रेसचं ठरलं! उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?





