सलमान खान ‘बिग बॉस ओटीटी-3’ शो करणार नाही होस्ट; कारण आलं समोर

Bigg Boss OTT-3| अभिनेता सलमान खान मागील अनेक वर्षांपासून ‘बिग बॉस’ शो होस्ट करतो. चित्रपटांसह या शोमुळे देखील त्याला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. यातच आता ‘बिग बॉस ओटीटी 3’ संदर्भात माहिती समोर आली आहे. यंदाच्या या सीझनला सलमान खान शो होस्ट करणार नाही. त्यामुळे आता निर्मात्यांनी शो होस्ट करण्यासाठी करण जोहर, अनिल कपूर आणि संजय दत्तशी संपर्क साधला असल्याचे म्हंटले जात आहे. परंतु याबाबत सध्या निर्मात्यांकडून काहीही सांगण्यात आलेले नाही.
सलमान त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तो हा शो होस्ट करणार नसल्याची माहिती समोर आली आहे. निर्मात्यांना या सीझनमध्ये देखील सलमान खानला होस्ट म्हणून घ्यायचे आहे. पण सलमानच्या तारख्या ठरत नसल्याने तो हा शो होस्ट करण्याची शक्यता फार कमी आहे. ‘बिग बॉस ओटीटी 3’ जूनमध्ये जिओ सिनेमा ॲपवर येऊ शकतो, असा अंदाज आहे. निर्मात्यांनी अद्याप काहीही सांगितले नसले तरी मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे.
दरम्यान, बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन करण जोहरने होस्ट केला होता, तर बिग बॉस सीझन 5 संजय दत्त होस्ट करत होता. त्याचवेळी सोशल मीडियावर या सीझनमध्ये शहजादा धामी, प्रतीक्षा होनमुखे, सना सईद आणि शिवांगी जोशी, श्रीराम चंद्रा, शीजन खान, वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित, विकी जैन हे सहभागी होऊ शकतात. पण निर्मात्यांनी अद्याप अधिकृतपणे कोणत्याही नावाची माहिती दिलेली नाही. Bigg Boss OTT-3|
सलमान खानच्या कामाबाबत सांगायचे झाले तर, सलमानचा आगामी चित्रपट ‘सिकंदर’ 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास व सलमान या चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात रश्मिका मंदाना सलमानबरोबर पहिल्यांदा झळकणार आहे. Bigg Boss OTT-3|
हेही वाचा:





