सलमान खान पापाराझींवर संतापला; भाचीची काळजी घेताना दिसला

Salman Khan | बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात सलमान पापराझींवर भडकल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील एका कार्यक्रमात सलमानसोबत त्याची भाची आयत सुद्धा होती. आयत ही सलमानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांची मुलगी आहे.
पापाराझींच्या गर्दीत सलमान त्याच्या भाचीची काळजी घेताना दिसला. या कार्यक्रमादरम्यान, चिमुकल्या आयतचा हात हातात घेऊन सलमान चालत होता. सलमानला पाहताच पापाराझींचा घोळका त्याच्याभोवती जमला. लोकांचा गराडा पाहून सलमानने त्याच्या भाचीपासून पापाराझींना लांब राहण्याचा इशारा दिला.
View this post on Instagram
सलमान पापाराझींना म्हणाला, “चला, चला मागे, छोटी मुलगी सोबत आहे, पुढे चालत राहा.” सलमान आणि आयतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. Salman Khan |
सलमान खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झाले तर, तो लवकरच ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये झळकणार आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या त्याच्या ‘सिकंदर’ या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका होती. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची फार जादू चालली नाही. Salman Khan |
हेही वाचा :





