#Sakinaka rape case : “तिचीच चूक असणार, तिचे कपडे चुकले असतील..” अभिनेत्री हेमांगी कवीने व्यक्त केल्या भावना

मुंबई – ऐन गणेशोत्सवाच्या काळात एक सुन्न करणारी घटना मुंबईतील साकीनाका परिसरात घडली. एका ३४ वर्षीय महिलेवर अमानुषपणे एका टेम्पोचालकाने बलात्कार केला आणि त्यानंतर पिडीतेच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याचा पाशवी प्रकार घडला.

साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी अभिनेत्री हेमांगी कवीनेही तिच्या भावनांना वाट मोकळी केली असून पुन्हा एकदा समाजात स्त्रीलाच दोषी ठरवलं जाईल असं म्हटलं आहे. या संदर्भातील एक पोस्ट सुद्धा तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

“आणखी एक! तिचीच चूक असणार! तिचे कपडे चुकले असतील! एवढ्या रात्री ती काय करत होती? एकटी होती की कुणासोबत होती? तिची जात काय, धर्म काय, कुठे काम करत होती? किती कमवत होती? लग्न झालेली होती, सिंगल होती, मुलं बाळं किती?

ती मुंबईची की आणखी कुठली! सगळं सगळं तीचंच चुकलं असणार! चला आता आपण तिलाच आणखीन घाबरऊन ठेऊया! बाकी त्याला कसलंच बंधन नको, सगळी सूट देऊया! काय?’ या आशयाची पोस्ट हेमांगीने केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.