Sajjangad Suicide Case – सज्जनगड किल्ल्यावरुन उडी मारुन संदेश पाडियाल (वय 35, रा. माची पेठ, सातारा) याने शुक्रवारी दुपारी आत्महत्या केली आहे. सातारा तालुका पोलिसांनी त्यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदेश पाडियाल हा गुरुवारी सज्जनगडावर गेले होते. त्यांनी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास किल्ल्यावरुन उडी मारली. ही बाब किल्ल्यावरील स्थानिक लोकांच्या लक्षात येताच त्यांनी सातारा तालुका पोलिसांना यांची माहिती दिली. पोलिसांनी किल्ल्यावर शोध मोहिम सुरु केली. काही वेळाने ते दरीत पडल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी दरीतून बाहेर काढले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. ते विवाहित असून आत्महत्या का केली अद्याप यांचे कोणतेही कारण समोर आलेले नाही. याबाबत तपास सुरु असल्याची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांनी दिली.