‘सैयारा’ची बॉलीवूडकरांनाही क्रेझ; अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत पोहचली थिएटरमध्ये

Saiyara Film | ‘सैयारा’ हा चित्रपट सुपरहिट ठरत आहे. यातील प्रेमकहाणीने तरुण वर्गाला अक्षरश: वेड लावले आहे. अनीत पड्डा आणि आणि अहान पांडे यांच्या अभिनयाने कमाल केली. देशभरातून दोघांच्याही अभिनयाचे कौतुक केले जात आहे. प्रेक्षक भावुक होऊन ढसाढसा रडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचदरम्यान आता बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीचा व्हिडीओ समोर आहे.
‘सैयारा’ चित्रपट पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने थिएटरमध्ये हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळाले. श्रद्धा कपूर बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत चित्रपट पाहण्यासाठी आली होती. व्हायरल व्हिडीओमध्ये श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी एकत्र बसलेले पाहायला मिळत आहेत. तसेच चित्रपट पाहताना श्रद्धा कपूर भावुक झाली आहे. तिच्या डोळ्यात पाणी दिसत आहे. Saiyara Film |
View this post on Instagram
‘सैयारा’ चित्रपट पाहिल्यानंतर सगळे निघायला लागतात तेव्हा श्रद्धा कपूरच्या मागे राहुल मोदीची झलक पाहायला मिळते. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. यावरून ‘सैयारा’ची क्रेझ बॉलिवूडमध्ये देखील पाहायला मिळत आहे. Saiyara Film |
‘सैयारा’ चित्रपट पाहून अनेकांना ‘आशिकी 2’ची आठवण येते. विशेष म्हणजे ‘आशिकी 2’मध्ये स्वतः श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होती. तर तिच्यासोबत अभिनेता आदित्य रॉय कपूर देखील होता. हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला होता. Saiyara Film |
हेही वाचा :
संजय गायकवाड Vs इम्तियाज जलील! ‘बॉक्सिंग’चा करारनामा देत जलील यांना दिले थेट ओपन चॅलेंज





