Aneet padda sister trolled : ‘सैयारा’ चित्रपटातील अभिनेत्री अनित पड्डाची (Aneet padda) बहीण, रीत पड्डा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरली आहे. तिने ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या सिनेमावर टीका ‘प्रोपोगंडा’ असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय तिनं आपल्या पोस्टमध्ये ‘काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटांच्या स्टोरीचाही उल्लेख केला होता. या चित्रपटांच्या कथानकावरही तिनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून रीत पड्डाला ट्रोल करण्यात आले. यानंतर तिने इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट केले. मात्र त्यानंतर नंतर तिनं थेट आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डिलिट केले. रीत पड्डाने तिचे इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट केले असले तरी, तिच्या पोस्टचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. Aneet padda sister trolled ‘धुरंधर २’ आणि इतर चित्रपटांवर उपस्थित केले प्रश्न Aneet padda sister trolled रीत पड्डाने ‘धुरंधर २’, ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’ या तिन्ही चित्रपटांवर टीका करताना त्यांना ‘सरकारी प्रोपोगंडा’ असे संबोधले. या चित्रपटांची निर्मिती केवळ सरकारचा प्रचार करण्यासाठी केली गेल्याचा दावा तिने केला. तिने नेटकऱ्यांना ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल आपली मते विचारली होती, ज्यावर तिला लोकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. dhurandhar 2 रीत पड्डाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘धुरंधर या चित्रपटाच्या बाबतीत हे खऱ्या अर्थाने सरकारला सपोर्ट करणारी फिल्म स्टोरी आहे. ज्यात नोटबंदीसारख्या गोष्टींना योग्य ठरवलं गेलं. यालाच प्रोपोगंडा असं म्हणतात. कदाचित तुमची प्रोपोगंडाची व्याख्या वेगळी असेल. याबाबत कुणालाच काहीच ठाऊक नाही’, असं रीत आपल्या पोस्टमध्ये म्हणाली. ‘द केरळ स्टोरी’बद्दल भाष्य करताना रीतने लिहिले, “हा चित्रपट स्वतःहून सर्व आकडेवारी सादर करत असल्याचे दिसते. ३२,००० महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे वृत्त यात दिले आहे. पण वास्तव हे आहे की हा आकडा सुमारे १०० च्या आसपास आहे. पण प्रचार अशाच प्रकारे चालतो, सत्याचा एक छोटासा भाग घ्या आणि तो चुकीच्या पद्धतीने सादर करा. यामुळे एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात एक चुकीचे कथानक तयार होते.” रीत पड्डाने पोस्टमध्ये काय म्हंटले? Aneet padda sister trolled रीत पड्डाने या तिन्ही चित्रपटांना ‘सरकारी प्रोपोगंडा’ मुव्ही असल्याचं म्हटलं होतं. हे चित्रपट सरकारचा प्रचार करण्यासाठी तयार करण्यात आल्याचं तिने म्हटलं. यावरून तिला सोशल मिडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. हेही वाचा: Pakistan Gas Pipeline Attack: दुष्काळात तेरावा महिना! पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांनी उडवली गॅस पाईपलाईन ; ५ महत्वाच्या जिल्ह्यांचा पुरवठा खंडित