सई ताम्हणकरने पॅराग्लायडिंगचा शेअर केला व्हिडिओ; प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याने केले कौतुक

Sai Tamhankar Paragliding Video | अभिनेत्री सई ताम्हणकर मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये देखील स्वत:ची एक वेगळी निर्माण केली आहे. उत्कृष्ट अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. याशिवाय सई सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. हॉट अँड बोल्ड लुकसाठी ओळखल्या जाणाऱ्या सईने पॅराग्लायडिंगचा अनुभव घेतला. ज्याचे व्हिडिओ आणि फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सईने पॅराग्लायडिंग करतानाच्या व्हिडीओला एक खास कॅप्शन लिहिलं आहे. “स्वातंत्र्य, शोध, धैर्य, परिवर्तन. सर्वात परिपूर्ण, रुजलेला, मंत्रमुग्ध करणारा, शुद्ध, थरारक प्रवास…”, असे तिने व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे. तिच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकरांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे बॉलीवूड अभिनेता आर माधवनने या व्हिडिओवर कमेंट करत सईचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
सई ताम्हणकरच्या या खास व्हिडीओवर अभिनेता ‘आर माधवन’ कमेंट करत लिहिले की, “व्वा.. सई तुझा खूप अभिमान आहे, मलाही हे करायला हवे.” यावर सईने “आर माधवन सर खूप धन्यवाद, आमच्यात सामील होण्यासाठी तुमचे स्वागत आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सईच्या पोस्टवर गायक विशाल दादलानी, शाल्मली खोलगडे , तेजस्विनी पंडित, प्रिया बापट, अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी या कलाकारांनी कमेंट करून तिचे कौतुक केले आहे. दरम्यान, सई पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेत आहे.





