सई ताम्हणकरने 61 वर्षीय अभिनेत्यावर व्यक्त केलं प्रेम, फोटो शेअर करत म्हणाली…; फोटोमधील ती व्यक्ती कोण?

Sai Tamhankar : मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या कामाची छाप सोडली आहे. तिने आजवर अनेक दमदार आणि लक्षवेधी भूमिका साकारलेल्या आहेत. या भूमिकांमधील तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले.
दुनियादारी चित्रपटाने सईला खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये काम केले आहे. तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. ती सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रीय असते. मात्र, नुकतीच तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर एक स्टोरी ठेवली होती. या स्टोरीत तिने चक्क ६१ वर्षीय अभिनेत्यावर प्रेम व्यक्त केलं आहे.
सई नेहमी तिच्या इन्स्टावरून तिचे फोटो शेअर करत असते किंवा मग ती शूटिंग सेटवरचे देखील फोटो शेअर करत असते. पण तिने स्टोरीला ठेवलेला फोटो ६१ वर्षीय अभिनेत्याचा असून त्याच नाव ब्रॅड पिट आहे. या अभिनेत्याने अनेक चित्रपटांमधून काम करत हॅालीवूड गाजवलं आहे. साठी ओलांडलेल्या ब्रॅड पिटवर खास फोटो शूट शेअर करत सईने प्रेम दाखवलं आहे.
View this post on Instagram
सध्या सईच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिचा गुलकंद नावाचा मराठी चित्रपट १ मे रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. १ महिना पूर्व होऊन देखील हा चित्रपट थिएटर्समध्ये सुरू आहे. याशिवाय सईने डब्बा कार्टेल आणि क्राईम बीट या सिरीजमध्ये लक्षवेधक भूमिका साकारलेल्या आहेत.





