Sai Sudharsan IPL 2026 Record: आयपीएल २०२६ च्या हंगामात गुजरात टायटन्सचा युवा फलंदाज साई सुदर्शनने आपल्या बॅटीचा जबरदस्त तडाखा सुरूच ठेवला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात सुदर्शनने ४४ चेंडूत ६१ धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि २ उत्तुंग षटकार लगावत आपल्या संघाला मजबूत धावसंख्या गाठून दिली. विराट कोहली आणि ख्रिस गेलच्या पंगतीत स्थान साई सुदर्शनने या हंगामात सातत्याने चांगली कामगिरी केली असून, त्याने मागील ६ पैकी ५ डावांत ५० हून अधिक धावा केल्या आहेत. या दमदार खेळीच्या जोरावर सुदर्शन आयपीएल २०२६ मध्ये ५०० धावांचा टप्पा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. या कामगिरीसह त्याने वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, सलग तीन आयपीएल हंगामात ५०० हून अधिक धावा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला असून, या बाबतीत त्याने विराट कोहली, शिखर धवन आणि ख्रिस गेल यांसारख्या दिग्गजांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. Innings Break! Useful contributions from Sai Sudharsan and Washington Sundar guide #GT to 1️⃣6️⃣8️⃣ 🎯#SRH chase on the other side ⌛️ Scorecard ▶️ https://t.co/o2tKKCeEaH#TATAIPL | #KhelBindaas | #GTvSRH pic.twitter.com/j4dlVVAPn6 — IndianPremierLeague (@IPL) May 12, 2026 हंगामातील आकडेवारी आणि सुदर्शनची ‘क्लास’ साई सुदर्शनने या हंगामात आतापर्यंत १२ सामन्यांत ५०१ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ अर्धशतके आणि १ शतकाचा समावेश असून त्याचा स्ट्राईक रेट १५५ इतका प्रभावी आहे. त्याने मागील सहा डावांत १००, ८७, ६, ५७, ५५ आणि ६१ अशा धावा करून आपली सातत्यपूर्ण खेळी सिद्ध केली आहे. त्याने संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत ४९ चौकार आणि २२ षटकार ठोकले आहेत. हेही वाचा – GT vs SRH : गुजरात टायटन्सचा मोठा विजय! बलाढ्य हैदराबादला अवघ्या ८६ धावांत गुंडाळत गुणतालिकेत पटकावलं अव्वल स्थान Mr. Consistent 😎 Sai Sudharsan is only the 4️⃣th player to score a half-century against every opponent he’s faced in the #TATAIPL ✅ Relive his knock ▶️ https://t.co/NXZlHrZwjZ #KhelBindaas | #GTvSRH | @gujarat_titans | @sais_1509 pic.twitter.com/iJzrKEdEAf — IndianPremierLeague (@IPL) May 12, 2026 गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वल हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १६८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ १४.५ षटकांत अवघ्या ८६ धावांत गारद झाला. गुजरातने हा सामना ८२ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत गुणतालिकेत १६ गुणांसह पहिले स्थान पटकावले आहे. या विजयामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे