Sai Sudharsan 1st player to cross 500 run mark IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या ५६ व्या सामन्यात मंगळवारी १२ मे रोजी गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात गुजरातचा सलामीवीर साई सुदर्शन याने आपल्या बॅटीची जादू पुन्हा एकदा दाखवून दिली. कठीण परिस्थितीत त्याने संयमी खेळी करत सलग तिसरे अर्धशतक झळकावले आणि गुजरातच्या डावाला आकार दिला. सुरुवातीच्या पडझडीनंतर सुदर्शनचा संघर्ष – गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस होती. गुजरातने प्रथम फलंदाजी स्वीकारली, मात्र त्यांची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार शुबमन गिल आणि जोस बटलर हे स्टार फलंदाज पॉवरप्लेमध्येच स्वस्तात बाद झाले. पहिल्या ६ षटकांत गुजरातला केवळ ३४ धावा करता आल्या होत्या. खेळपट्टी संथ असल्याने आणि हैदराबादची गोलंदाजी शिस्तबद्ध असल्याने फलंदाजी करणे सोपे नव्हते, पण साई सुदर्शनने एक बाजू लावून धरली. The hallmark of top players? Delivering again and again👏 Sai Sudharsan completes a hat-trick of fifties and earns massive praise from the commentators.#TATAIPL Race To Playoffs 2026 ➡️ #GTvSRH | LIVE NOW 👉https://t.co/mPjP1tWrsI pic.twitter.com/VrloTP2Vqg — Star Sports (@StarSportsIndia) May 12, 2026 विक्रमी ५०० धावांचा टप्पा पूर्ण – Dedicating this knock to a cause beyond the game 💜#GTCares pic.twitter.com/5qADUmd4j4 — Gujarat Titans (@gujarat_titans) May 12, 2026 सुदर्शनने सावध पवित्रा घेत ३८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या हंगामातील हे त्याचे पाचवे अर्धशतक ठरले. शेवटी १७ व्या षटकात साकिब हुसेनच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने ४४ चेंडूत ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीदरम्यान सुदर्शनने आयपीएल २०२६ मध्ये ५०० धावांचा टप्पा ओलांडला असून अशी कामगिरी करणारा तो या हंगामातील पहिला फलंदाज ठरला आहे. सध्या तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या शर्यतीत (ऑरेंज कॅप) पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या हंगामात त्याने आतापर्यंत १ शतक आणि ५ अर्धशतकांसह सहा वेळा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. हेही वाचा – Masterchef Vaibhav Sooryavanshi : ‘मम्मीच्या रोटीपेक्षाही गोल…’, वैभव सूर्यवंशी झाला मास्टरशेफ! राजस्थान रॉयल्सने शेअर केला भन्नाट VIDEO दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरनेही आक्रमक पवित्रा घेत ३३ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार मारले. जेसन होल्डरनेही शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा केल्या आणि सुंदरसोबत मिळून २१ चेंडूंमध्ये ४० धावा करत संघाची धावसंख्या १६८ पर्यंत पोहोचवली. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, साकिब हुसेन आणि प्रफुल्ल हिंगे यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली. कर्णधार पॅट कमिन्सलाही यश मिळाले.