साई पल्लवीचा सुपरहिट चित्रपट OTTवर होणार रिलीज; कधी आणि कुठे पाहता येणार?

Amaran OTT Release | दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि शिवकार्तिकेयन यांचा सुपरहिट ठरलेला ‘अमरन’ चित्रपट आता ओटीटीवर पाहता येणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात एका लष्करी अधिकाऱ्याचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. ‘अमरन’ हा आर्मी ऑफिसर मेजर मुकुंद वरदराजन यांच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर आता याची OTT वर रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
‘अमरन’ चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ५ डिसेंबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शिव कार्तिकेयनने मुकुंद वरदराजन यांची भूमिका साकारली आहे. दहशतवादविरोधी कारवायांमध्ये त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. या चित्रपटातील अभिनयासाठी शिवकार्तिकेयनला अलीकडेच चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीने सन्मानित केले. Amaran OTT Release |
राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित ‘अमरन’ हा शिवा आरूर आणि राहुल सिंग यांनी लिहिलेल्या ‘इंडियाज मोस्ट फियरलेस: ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हीरोज’ या पुस्तकातील मेजर मुकुंद वरदराजन यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात मेजर मुकुंद (शिवकार्तिकेयन) आणि त्यांची पत्नी इंदू रेबेका वर्गीस (साई पल्लवी) यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
‘अमरन’ हा 2024 साली प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक ठरला आहे. 31 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 320 कोटींहून अधिक कमाई केली होती.
हेही वाचा :
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्याला मिळणार संधी? मोहोळांनी स्वत: केला खुलासा





