Pimpri : साई जीवन शाळेचा परिसर केला स्वच्छ
Updated On:

चिखली : साई जीवन शाळेबद्दल ज्ञानमंदिर कि दारूचा अड्डा या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल महापालिका प्रशासनाने त्वरीत घेतली. शाळा परिसर स्वच्छ धुवून काढल्याने शाळा परिसर व वरांडा अगदी स्वच्छ दिसत आहे.
शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे. त्यामुळे या परिसरात कोणीही अस्वच्छता करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन शाळेतील शिक्षकांनी केले. शाळेतील बंद खोल्यांचा वापर शैक्षणिक कामासाठी केला जावा. तसेच या बंद खोल्यांची अधिक पडझड होऊ नये म्हणून या शाळेतील वर्ग स्वच्छते ठेवावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विशाल आहेर यांनी केले आहे.
यापुढे शालेय परिसरात दारू पिणे अथवा गुटखा खाऊन थुंकणे, असे प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा भाजप नगरसेविका अश्विनी जाधव यांनी दिला आहे. त्यांनी नागरिकांना शाळा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे.





