मांडवगण फराटा -बेकायदा जमाव जमवून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाघनाथ ऊर्फ चड्ड्या गवळी, पारुबाई ऊर्फ पुष्पावती बाबुराव जगदाळे, बाबूराव दिनकर जगदाळे, नवनाथ ऊर्फ दादा बाबुराव जगदाळे, भाऊसाहेब पंढरीनाथ गायकवाड, मयूर कोऱ्हाळे, अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. तर अभिजीत अनिल थोरात (वय 29) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.