साहनी यांनी आयसीसीच्या मुख्य कार्यकारी पदाचा भार स्विकारला

दुबई  – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी पदाचा पदभार माध्यम व्यावसायिक मनू साहनी यांनी स्वीकारला असून आयसीसीच्या वतीने शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने साहनी यांची निवड केली होती. विद्यमान कार्यकारी डेव्ह रिचर्डसन हे त्यांच्या समवेत जुलै मध्ये पार पडणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या समारोपापर्यंत कार्यरत राहणार असून त्यानंतर ते निवृत्ती स्वीकारणार आहेत.

ईएसपीएन स्टार स्पोर्टसचे माजी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कामकाज केलेले साहनी हे या कालावधीच्या अंतिम सहा आठवडयांमध्ये रिचर्डसन यांच्यासमवेत कामकाज करून हस्तांतरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याबाबत दक्षता घेणार आहेत. साहनी यांची नियुक्ती जानेवारी महिन्यातच करण्यात आली होती. मात्र त्याच वेळी रिचर्डसन जुलैपर्यंत कार्यरत राहणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.