नवीदिल्ली – पेले हे जगातील महान आणि सर्वात प्रिय फुटबॉलपटूंपैकी एक होते. वयाच्या व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ ब्राझीलमध्येच नव्हे तर संपूर्ण जगात आणि संपूर्ण फुटबॉल विश्वात शोककळा पसरली आहे. पेले हे तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकणारे एकमेव खेळाडू होते.पेले २०२१ पासून कोनल कॅन्सरवर उपचार घेत होते. काही आजारांमुळे ते गेल्या महिन्यापासून रुग्णालयात दाखल होते.अखेर त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली. पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. पेले यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने १९५८, १९६२ आणि १९७० मध्ये विश्वचषक जिंकले होते. सध्याच्या पिढीतील तीन सर्वोत्तम फुटबॉलपटू, अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी, पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि ब्राझीलचा नेमार यांनी पेले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.