Ganesh Rayte : दु:खद बातमी! सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॅान्स्टेबलचा मृत्यू
Ganesh Rayte : गणेश रायते असं मृत्यू झालेल्या पोलिस कॅान्स्टेबलचं नाव असून त्यांचा हृदयविकारच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. रायते यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते ४१ वर्षांचे होते.

Ganesh Rayte : मु्ंबईतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॅालिवूड अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलिस कॅान्स्टेबलचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
गणेश रायते असं मृत्यू झालेल्या पोलिस कॅान्स्टेबलचं नाव असून त्यांचा हृदयविकारच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. रायते यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते ४१ वर्षांचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश रायते गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैणात होते. त्यांना काल सायंकाळी अचानकअस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॅाक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
गणेश रायते हे गॅलेक्सीबाहेर गार्ड ड्युटीवर तैनात असताना काल संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना तत्काळ भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
प्राथमिक अहवालानुसार, कॉन्स्टेबल गणेश रायते यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) असल्याचं म्हटलं जात आहे. तथापि, पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, सविस्तर वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण निश्चित होईल.
पोलीस सूत्रांनुसार, रायते यांनी मुंबई पोलिसात दाखल होण्यापूर्वी भारतीय सैन्यात सेवा बजावली होती. मुंबई पोलीस दलाने त्यांना वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानी सुरक्षा पुरवण्यासाठी तैनात केले होते. त्यांच्या मृत्यूमुळे पोलीस प्रशासनातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Bhor News: भोर तालुक्यातील मतदारांनो लक्ष द्या! मतदार गणना फॉर्म भरण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ





