दुःखद! वाठार येथे अपघातात २१ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

कराड (प्रतिनिधी) – वाठार, ता. कराड गावच्या हद्दीत राधाकृष्ण रेस्टॉरंटसमोर एसटी बसला पाठीमागून येणाऱ्या हिरो स्प्लेंडर मोटारसायकलने जोराची धडक दिली. या अपघातात जखमी झालेला मोटारसायकलस्वार सौरव अनिल जाधव (वय 21 रा. अतीत, ता. सातारा) याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मोटारसायकलवर मागे बसलेली व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चालक सयाजी यादव एसटी बस (एमएच-14-बीटी-0834) घेऊन कराडहून कासारशिरंबेकडे शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास निघाले होते. बस वाठार गावच्या हद्दीत आल्यावर पाठीमागून भरधाव आलेल्या हिरो मोटारसायकलने (एमएच-50-बी-2791) बसला धडक दिली. या अपघातात सौरव जाधव हा गंभीर जखमी झाला. 

परिसरातील लोकांनी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दुपारी जाधवचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.