Sachin Tendulkar : क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान फलंदाज म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आजही लाखो चाहत्यांच्या मनात ‘क्रिकेटचा देव’ म्हणून वास करतात. २४ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत त्याने असंख्य विक्रम प्रस्थापित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (३४,३५७) आणि शतकांचा शतकवीर (१०० शतके) ही त्याची (Sachin Tendulkar) सर्वात मोठी ओळख आहे. मात्र, त्याच्या निवृत्तीनंतर १३ वर्षांनंतर एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. माजी BCCI मुख्य निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांनी पत्रकार विकी लालवानी यांच्या पॉडकास्टमध्ये दिलेल्या खास मुलाखतीत सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीपूर्वी घडलेल्या घटनेचा खुलासा केला. २०१२-१३ या काळात सचिनचा फॉर्म खालावला होता. त्यामुळे निवड समितीने त्याचा पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती. हे ऐकून सचिनलादेखील धक्का बसला होता, असं पाटील यांनी सांगितलं. Sachin Tendulkar सचिनचा फॉर्म आणि निवड समितीची चिंता Sachin Tendulkar २०१२ हे वर्ष सचिनसाठी खूप कठीण गेलं. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ९ सामन्यांत फक्त २३.८० च्या सरासरीने धावा केल्या, एकही शतक नव्हतं. वनडे क्रिकेटमध्येही १० सामन्यांत सरासरी ३१.५० इतकीच होती. वयाच्या ३९व्या वर्षी पोहोचलेल्या सचिनची कामगिरी संघासाठी फायदेशीर ठरत नव्हती, असं निवड समितीला वाटत होतं. संदीप पाटील यांनी सांगितलं की, “आम्ही सचिनला भेटायला बोलावलं. मी त्याला विचारलं, ‘पुढचा प्लॅन काय आहे?’ त्याने ‘का?’ असा प्रश्न विचारला. मी सांगितलं की, निवड समिती तुझा पर्याय शोधत आहे. हे ऐकून तो खूप धक्का बसल्यासारखा झाला. तो म्हणाला, ‘खरंच?’ मी होकार दिला. नंतर त्याने पुन्हा फोन करून विचारलं, ‘तुम्ही गांभीर्याने सांगताय ना?’ मी हो म्हणालो.” निवृत्तीचा निर्णय आणि त्यानंतरची घटना Sachin Tendulkar संदीप पाटील यांच्या म्हणण्यानुसार, ही चर्चा झाल्यानंतर काही दिवसांतच सचिनने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर तो टेस्ट क्रिकेटमध्ये आणखी एक वर्ष खेळला. २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वानखेडे मैदानावर त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना झाला. हा सामना मुंबईत ठेवण्यात आला होता, कारण सचिनने BCCI कडे खास विनंती केली होती की त्याच्या आईला हा सामना प्रत्यक्ष पाहता यावा. Sachin Tendulkar पाटील यांनी स्पष्ट केलं की, निवड समितीने कधीही सचिनला थेट निवृत्त होण्यास सांगितलं नव्हतं किंवा ड्रॉप केलं नव्हतं. “आम्ही फक्त पर्याय शोधण्याबद्दल बोललो. पण त्यानंतर त्याने स्वतः निवृत्तीचा निर्णय घेतला. मी त्याला नंतर फोन केला आणि तेव्हा त्याने सांगितलं, ‘सॅंडी, मी निवृत्ती जाहीर करतोय.’ हे ऐकून मला वाईट वाटलं, पण हा निर्णय संघासाठी आवश्यक होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेसारख्या प्रतिभावान खेळाडूला संधी मिळाली.” पाटील पुढे म्हणाले की, त्यांच्या कार्यकाळाची आठवण अनेकदा फक्त सचिन तेंडुलकरच्या यांच्या निवृत्तीशी जोडली जाते. मात्र त्याच काळात जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमी यांसारख्या प्रतिभावंत खेळाडूंना संधी देण्यात आली होती, याचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. हा खुलासा १३ वर्षांनंतर समोर आल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे.