\n\nSachin Tendulkar Cuts Cake With Fans on 53rd Birthday#SachinTendulkar #HappyBirthdaySachin #GodOfCricket #MumbaiIndians pic.twitter.com/qNIH8ISXY5
\n— MK Sharma ✍️ (@EmediaManoj) April 24, 2026
\nसचिनने शेअर केलेल्या फोटोत तो पत्नी अंजली आणि आई रजनी तेंडुलकर यांच्यासोबत सोफ्यावर बसलेला दिसत आहे. मात्र, सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते सचिनच्या मांडीवर बसलेल्या एका गोड सदस्याने. हा सदस्य म्हणजे त्याचा गोल्डन रिट्रीव्हर जातीचा पाळीव कुत्रा. सचिनने त्याला गमतीने ‘The Trouble Maker’ असे संबोधले आहे. या फोटोवरून सचिनचे प्राणीप्रेम आणि घरातील त्याचा मस्तीखोर स्वभाव समोर आला आहे.
\n\nA day full of love, smiles & legacy ❤️🎂
\n
\nSachin Tendulkar celebrating his special day with family and fans — just the way it should be 👑[ Sachin Tendulkar, God of cricket, Fans, Family, Birthday]. pic.twitter.com/QRRuLb7I0f
\n— SportsTiger (@The_SportsTiger) April 24, 2026
\nया फोटोच्या पार्श्वभूमीवर सचिनच्या घरातील देव्हारा आणि भिंतीवर लावलेले गणपती, विठ्ठल-रखुमाई आणि इतर देवादिकांचे फोटो दिसत आहेत. हे दृश्य सचिनच्या घरातील संस्कार आणि भक्तिमय वातावरणाची साक्ष देते. मुंबई इंडियन्ससह जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटूंनी सचिनच्या या साधेपणाचे कौतुक करत त्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ५३ व्या वर्षीही सचिनचा उत्साह आणि कुटुंबाप्रती असलेले प्रेम त्याच्या चाहत्यांना प्रेरणा देत आहे. (Sachin Tendulkar Birthday)