पुणे जिल्हा भाजप सचिव पदी सचिन जाधव तर वाघोली शहराध्यक्षपदी केतन जाधव यांची निवड
Updated On:

वाघोली – पुणे जिल्हा भाजप सचिवपदी केसनंद ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच सचिन जाधव यांची तर वाघोली भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष पदी केतन जाधव यांची निवड करण्यात आली.
पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे, पश्चिम महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, यांच्या हस्ते दोघांना निवडीचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी भाजप नेते बाबाराजे जाधवराव, राहुल शेवाळे, भाजपचे सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, सुदर्शन चौधरी, अविनाश बवरे, हवेली तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल सातव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.



