\n\nLaura Wolvaardt’s 330 runs in this series against India are the most by a woman in any T20I series or tournament 🔥 pic.twitter.com/LoqA3aAwRp
\n— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 27, 2026
\nलॉरा वुल्वार्टने ५६ चेंडूंत नाबाद ९२ धावांची स्फोटक खेळी केली. तिच्या या खेळीत ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तिने संपूर्ण मालिकेतील ५ सामन्यांत ८२.५ च्या सरासरीने ३३० धावा कुटल्या, ज्यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तिच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे तिला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेयर ऑफ द सिरीज’ या दोन्ही पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
\n\nOn the move 👊
\nBharti Fulmali upping the ante 📈#TeamIndia 74/3 after 12 overs.
\nUpdates ▶️ https://t.co/zwoncYxXno #SAvIND pic.twitter.com/ifFPF5VlCf
\n— BCCI Women (@BCCIWomen) April 27, 2026
\n१५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. स्फोटक फलंदाज शफाली वर्मा केवळ ४ धावांवर बाद झाली, तर जेमिमा रॉड्रिग्सला फक्त भोपळा फोडता (१ धाव) आला. भारती फूलमालीने ४० धावा करत थोडा संघर्ष केला, पण इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. अनुष्का शर्मा (१७), दीप्ती शर्मा (८) आणि अरुंधती रेड्डी (१) यांनी निराशा केली. यष्टिरक्षक ऋचा घोषने नाबाद २५ धावा केल्या, मात्र तोपर्यंत सामना भारताच्या हातून निसटला होता. दक्षिण आफ्रिकेकडून म्लाबा आणि डी क्लर्क यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.