एस. पी. मिस्त्री यांची टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करण्याची मागणी; पारदर्शकतेवर भर

नवी दिल्ली – शापोरजी पालोनजी समूहाचे अध्यक्ष एस पी मिस्त्री यांनी टाटा सन्सची शेअर बाजारावर नोंदणी करून पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे. या समूहाचे टाटा सन्समध्ये 18.37% इतके भाग भांडवल आहे.
रिझर्व बँकेने टाटा सन्सची नोंदणी शेअर बाजारावर करण्याची सूचना केली आहे. ती अंमलात आणण्याची गरज आहे असे मिस्त्री म्हणाले. जर टाटा सन्सची नोंदणी झाली तर टाटा सन्समधील विविध कंपन्यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना याचा लाभ होईल. त्याचबरोबर या क्षेत्रात पारदर्शकता वाढेल असे ते म्हणाले.
दरम्यान टाटा टाटा ट्रस्टस्च्या ट्रस्टींची बैठक शुक्रवारी झाली. मात्र या बैठकीत मतभेदाच्या विषयावर चर्चा झाली नाही. टाटा समूहातील कंपन्यांचे व्यवस्थापन आणि संचालक मंडळातील नियुक्तीबाबत ट्रस्टीदरम्यान मतभेद असल्याचे समजले जाते.
सूत्रांनी सांगितले की, आरोग्यविषयक उपक्रमावर चर्चा झाली. इतर विषय चर्चेसाठी पुढे आले नाहीत. टाटा समूहातील टाटा टाटा ट्रस्टस्चे अध्यक्ष नोएल टाटा, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन, टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष वेणू श्रीनिवासन ट्रस्टी दारिअस खंबाटा यांनी मंगळवारी गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली होती.
आजच्या बैठकीबाबत टाटा टाटा ट्रस्टस्ने कसलेही निवेदन काढले नाही. टाटा समूहाचे बाजार मूल्य 180 अब्ज डॉलरचे आहे. या समूहातील टाटा सन्स या कंपनीचे व्यवस्थापन टाटा टाटा ट्रस्टस्कडून केले जात असून टाटा टाटा ट्रस्टस्चे टाटा सन्समध्ये 66. 66% भाग भांडवल आहे.
या समूहातील मतभेदाचा केवळ टाटा समूहावरच नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे हे मतभेद वाढू नये त्यासाठी सरकारसह अनेक घटक पुढाकार घेत आहेत.
त्या अगोदर झालेल्या बैठकीत मेहली मिस्त्री यांनी टाटा सन्समधील घडामोडी बाबत टाटा टाटा ट्रस्टस्ला पुरेशी माहिती दिली जात नसल्याचे म्हटले असल्याचे बोलले जाते. या विषयावरून टाटा टाटा ट्रस्टस्वरील एक ट्रस्टी विजय सिंग यांची फेरनियुक्ती होऊ शकली नव्हती.
त्यानंतर हे प्रकरण सरकारकडे गेले होते. जरी टाटा समूहातील अधिकार्यांनी निर्मला सीतारामन आणि अमित शहा यांची भेट घेतली असली तरी त्यानंतर टाटा सन्सच्या कुठल्याही अधिकार्याने किंवा सरकारने कसलेही निवेदन जारी केलेले नाही.




