S. Kamaraj : तमिळनाडूतील एएमएमके या पक्षाने आपले एकमेव आमदार एस.कामराज (S. Kamaraj) यांची रविवारी पक्षातून हकालपट्टी केली. विधानसभेतील शक्तिपरीक्षेवेळी टीव्हीके सरकारला पाठिंबा दिल्याने ती कारवाई करण्यात आली. एएमएमकेचे प्रमुख टी.टी.व्ही.दिनाकरन यांनी पक्षविरोधी कारवायांबद्दल कामराज (S. Kamaraj) यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची माहिती दिली. कामराज यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सूचित केले. त्यामुळे तमिळनाडूतील एनडीएचा घटक असणाऱ्या आणखी एका पक्षातील बेबनाव चव्हाट्यावर आला. S. Kamaraj त्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुक, भाजप, पीएमके आणि एएमएमकेचा समावेश असणाऱ्या एनडीएची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. त्यानंतर नवे मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके सरकारला पाठिंबा देण्यावरून अण्णाद्रमुकमध्ये बंडाचे निशाण फडकले. त्या पक्षातील बंडखोर गटाने विधानसभेतील शक्तिपरीक्षेवेळी सरकारच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे सरकारने आरामात बहुमत सिद्ध केले. एएमएमकेचे एकमेव आमदार कामराज (S. Kamaraj) हेही सत्ताधाऱ्यांच्या गोटात गेल्याचे स्पष्ट झाले. तमिळनाडूत एएमएमकेने एकूण ११ जागा लढवल्या. मात्र, त्या पक्षाचा एकमेव उमेदवार कामराज यांच्या रूपाने विजयी झाला.