\n\nRyan Rickelton breaks Sanath Jayasuriya’s 18-year record for the fastest hundred for MI in IPL history.
\nBut Sanath was the one who set the benchmark. Legend. 🇱🇰🔥 pic.twitter.com/HBVRP1raCu
\n— Cricwire (@CricWireLK) April 29, 2026
\nरिकल्टनने या खेळीसह मुंबई इंडियन्ससाठी सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. त्याने श्रीलंकेचे दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्या याचा २००८ मधील ४५ चेंडूंतील शतकाचा विक्रम मोडीत काढला. विशेष म्हणजे, याच हंगामात तिलक वर्मानेही ४५ चेंडूंत शतक झळकावून जयसूर्यांच्या विक्रमाची बरोबरी केली होती, पण आता रिकल्टनने सर्वांना मागे टाकले आहे.
\n\nInnings Break!
\nA marathon 1⃣2⃣3⃣*(55) from Ryan Rickelton propels #MI to a huge total 📈🎯
\nWill #SRH chase it and continue their winning run? 🤔
\nScorecard ▶️ https://t.co/ypWTkEr2Rc#TATAIPL | #KhelBindaas | #MIvSRH pic.twitter.com/LJb01p5mc8
\n— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2026
\nया हंगामात मुंबई इंडियन्ससाठी शतक झळकावणारा रिकल्टन हा तिसरा फलंदाज ठरला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या वर्षी मुंबईसाठी झालेली तिन्ही शतके ही डावखुऱ्या फलंदाजांनीच (Left-handed batsmen) ठोकली आहेत. रिकल्टनपूर्वी क्विंटन डिकॉक (विरुद्ध पंजाब) आणि तिलक वर्मा (विरुद्ध गुजरात) यांनी शतकी खेळी केली होती. रिकल्टनने विल जॅक्ससोबत ९३ धावांची सलामी देत अवघ्या २३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. मुंबईने गेल्या ४ सामन्यांपैकी ३ सामन्यात शतके झळकावून आपली फलंदाजीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.