अध्यक्षीय निवडणुकांमधील रशियाचा हस्तक्षेप प्रकरण : ट्रम्प यांनी 29 जणांना केले माफ

वॉशिंग्टन – अमेरिकेमध्ये 2016 साली झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये रशियाच्या हस्तक्षेपाच्या आरोपावरून करण्यात आलेल्या तपसात दोषी आढळलेल्या 29 जणांना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माफ केले आहे. या 29 जणांमध्ये काही माजी सहकाऱ्यांचाही समावेश आहे.

 बुधवारी माफ केलेल्यांमध्ये रॉजर स्टोन आणि पॉल मॅनाफोर्ट यासारख्या काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे. रॉबर्ट मुलर यांनी केलेल्या तपासादरम्यान त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. 

रशियाबरोबर संगनमत करून पॉल मॅनाफोर्ट यांनी अध्यक्षीय निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा आरोप विशेष न्यायाधीश मुलर यांच्या तपासादरम्यान सिद्ध झाला होता. मॅनाफोर्ट यांनी यापूर्वीच दोन वर्षे तुरुंगात काढली आहेत. त्यापूर्वीही त्यांना मोठ्या कालावधीसाठी ताब्यात घेतले गेले होते. 

मॅनाफोर्ट यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यावर अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विदेशी हस्तक्षेपाचे मोठे रॅकेट उघड झाले होते. त्यांच्याबरोबर अनेक बड्या पदाधिकारी, उद्योगपती, विदेशातील प्रशासकीय अधिकारी आणि अनेक लोकप्रतिनिधींचा सहभाग या रॅकेटमध्ये असल्याचे सिद्ध झाले होते.

या वर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढायला लागल्यावर तुरुंगातील अनेक कैद्यांची सुटका केली गेली होती. त्यानुसार मॅनाफोर्ट यांनाही तुरुंगातून सोडले गेले होते. रॉजर स्टोन यांचे वय 68 असून त्यांची प्रकृती ठीक नसल्याच्या कारणावरून त्यांची शिक्षाही ट्रम्प यांनी यापूर्वीच माफ केली आहे. अटकेच्यावेळी पहाटे घरी छापा घालून स्टोन यांना अटक केली गेली होती. त्याला प्रसिद्धी माध्यमांकडून मोठी प्रसिद्धी दिली गेली होती.

ट्रम्प यांनी माफ केलेल्यांमध्ये त्यांच्या जावयाचे वडील चार्ल्स कुश्‍नर हे देखील आहेत. अत्यांनी स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून खूप काम केले असल्यामुळे त्यांच्या दोषीपणाकडे डोळेझाक झाली होती.
आपल्या निकटवर्तीयांची शिक्षा माफ करून ट्रम्प पूर्वीचे संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निरीक्षण आता व्यक्‍त होऊ लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.