पॅरिस : युक्रेन आणि रशियामधील युद्धामध्ये आता युक्रेनमधील जवळपास सर्व प्रमुख शहरे उद्ध्वस्त झाली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, युक्रेनच्या खासदारांनी रशियावर मोठा गंभीर आरोप केला आहे. रशियन सैनिक युक्रेनमध्ये बलात्कार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रशियन सैनिक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांवर बलात्कार करून नंतर त्यांना फाशी देत असल्याचा दावा रशियातील खासदारांनी केला आहे.
युक्रेनच्या विरोधी होलोस पक्षाच्या खासदार लेसिया वासिलेंको यांनी याविषयी दावा केला आहे. यामध्ये त्यांनी,”सैनिक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांवर बलात्कार करत आहेत. त्याचबरोबर हिंसा टाळण्यासाठी अनेक महिलांनी लैंगिक अत्याचारानंतर आत्महत्या केल्या, तर काही इतक्या अशक्त होत्या की अत्याचारानंतर त्या जगू शकल्या नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लेसिया वासिलेंको म्हणाल्या की, युद्धादरम्यान 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांवर बलात्कार झाल्यानंतर त्यांनी फाशी देण्यात आली किंवा काहींनी स्वतःचा जीव घेतला. त्या सांगितले की, यामध्ये मुख्य अडचण ही आहे की पीडित आणि कुटुंबीयांकडे या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद किंवा क्षमता नाही.
तसेच बलात्कार झालेल्या काही महिलांनाही फाशी देण्यात आली आहे. या अन्यायाविरुद्ध आम्ही पुरावे गोळा करत आहोत आणि युद्धादरम्यान झालेल्या या गुन्ह्याची खटला आम्ही ईसीएचआर (युरोपियन कन्व्हेन्शन ऑन ह्युमन राइट्स) कडे नेणार आहोत, असे त्यांनी सांगितले आहे.
युक्रेनमध्ये पीडितांना योग्य मदत मिळण्यासाठी त्यांनी मानवतावादी मदत देण्याचे सरकारला आवाहन केले आहे. या महिलांच्या मदतीने आम्ही युद्धादरम्यान केलेल्या गुन्ह्यांचे पुरावे गोळा करू शकू आणि पुतिन यांच्यावर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात युद्ध गुन्ह्यांचा खटला चालवता येईल, असे त्यांनी सांगितले.