Russia-Ukraine War : अमेरिका आणि ब्रिटनच्या लष्करी केंद्रांना लक्ष्य करणार – व्लादिमीर पुतिन

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आता अमेरिका आणि ब्रिटनच्या लष्करी सुविधांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. युक्रेनने रशियावर अमेरिकन आणि ब्रिटिश क्षेपणास्त्रे डागल्यानंतर रशियन राष्ट्राध्यक्षांची धमकी आली आहे. त्यांच्या दूरचित्रवाणी भाषणात पुतिन यांनी पाश्चात्य देशांवर थेट हल्ले करण्याची धमकी दिली.
पुतिन म्हणाले की त्यांच्या देशाने गुरुवारी युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात नवीन आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. मात्र, त्यांनी ज्या देशांना इशारा दिला आहे त्या देशांचे थेट नाव घेतले नाही. ते म्हणाले, रशियाविरूद्ध शस्त्रे वापरण्याची परवानगी देणाऱ्या देशांच्या लष्करी सुविधांविरूद्ध शस्त्रे वापरण्याचा रशियाला अधिकार असल्याचे आम्ही मानतो. युक्रेनमध्ये पश्चिमेकडून भडकवलेल्या युद्धाने जागतिक स्वरूपाचे घटक आत्मसाथ केले आहेत अशी टिप्पणीही त्यांनी केली. ते म्हणाले की आमच्यावर हल्ला करण्यासाठी जे युक्रेनला शस्त्रास्त्रे देत आहेत त्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली जाईल. तसेच ज्या देशांना आम्ही लक्ष्य करू त्यांना अगोदर सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशाराही दिली जाईल.
दरम्यान, पुतिन यांनी जाहीर केले की रशियन सैन्याने युक्रेनवरील हल्ल्यात नवीन मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. इतर गोष्टींबरोबरच, नवीनतम रशियन मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणालींपैकी एकाची चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम असल्याचे पुतीन यांनी सूचित केले. मध्यम-श्रेणीची क्षेपणास्त्रे सहसा 5500 किलोमीटरपर्यंत पोहोचतात. एवढा पल्ला पश्चिमेकडच्या देशांवरच्या आपल्या हल्ल्याची धमकी पूर्ण करण्यासाठी पुरेसा असल्याचेही पुतीन यांनी यातून सूचित केले.
UN Security Council Veto Right : सगळ्या देशांकडे व्हेटो असायला हवा – पी. हरीश
दरम्यान, पुतीन यांच्या या इशारेवजा धमकीचा ब्रिटनने निषेध केला आहे. पुतीन यांनी ब्रिटनचे जरी थेट नाव घेतले नसले तरी दोन दिवसांपूर्वी युक्रेनने रशियावर जे क्षेपणास्त्र डागले होते ते ब्रिटनचेच होते.





