नवी दिल्ली – गेले काही दिवस, तिसरे जागतिक महायुद्ध सुरू होणार अशा चर्चांना ऊत आला होता. अखेर आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात झाली आहे.
युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. युक्रेनची राजधानी कीव आणि खार्किवसह अनेक शहरांमध्ये जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू येत असून, मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
दरम्यान, अश्यातच एका युक्रेनियन महिलेनं दावा केला की, रशियन सैनिक तिला टिंडर सोशल मीडियावर फ्लर्टी स्वरूपातील काही संदेश आणि व्हिडिओ पाठवत आहेत. दशा सिनेलनिकोवा असं या युक्रेनियन महिलेचं नाव आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
महिलेने सांगितले, ‘की गेल्या काही दिवसांपासून अनेक रशियन सैनिक तिला टिंडरवर मेसेज आणि रिक्वेस्ट पाठवत आहेत. दशाचा दावा आहे, की अनेक रशियन सैनिक तिला सोशल मीडियावर फ्लर्ट करण्यासाठी कॉल करत आहेत. काही सैनिकांनी त्यांची छायाचित्रे पाठवून त्यांच्या पदाची आणि स्थितीची माहिती दिली आहे. या सर्व प्रकरणामुळे दशा त्रस्त झाली आहे.
दरम्यान, पुतीन यांनी अमेरिका आणि नाटो यांना उघडपणे धमकी दिली आहे की त्यांनी हस्तक्षेप करू नये, अन्यथा त्यांना इतिहासातील सर्वात वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. हा हल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला जात आहे.