रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यामुळे महिलांना अश्रू अनावर म्हणाल्या,’ताई नको…ताई नको..; राजीनामा देऊ नका’

Updated On:

मुंबई – राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय रुपाली चाकणकर यांनी घेतला आहे. त्यांनी आज मुंबईत आपल्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आता या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे राष्ट्रवादी महिला अध्यक्ष आणि महिला आयोग अध्यक्ष अशा दोन्ही जबाबदाऱ्या आहे. यामुळे रुपाली चाकणकर यांनी “एक व्यक्ती, एक पद’ यानुसार राजीनामा दिला.

रुपाली चाकणकर या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं कळताच महिला कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री जयंत पाटील यांचेही आभार मानले. इतकंच काय तर त्यांच्या भाषणावेळी ‘ताई, नको; ताई, नको; तुम्ही राजीनामा देऊ नका’ असंही महिला म्हणू लागल्या. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, पक्षाने जी जबाबदारी दिली ती चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न केला. या संघटनेच्या कामाची पावती म्हणून राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद दिले. सामान्य कार्यकर्त्याला आयोगाचे अध्यक्षपद देऊन जो काही सन्मान दिला त्याबद्दल आभारी आहे. राज्य महिला आयोगाचे पद हे संवैधिनिक पद आहे. या पदावर निपक्षपाती काम करणं अपेक्षित असतं म्हणून राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा देते, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

पुण्यातील राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचे काम रुपाली चाकणकर पाहत होत्या. 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्षाला रामराम करत भाजपत प्रवेश केला. त्यानंतर या पदाची जबाबदारी रुपाली चाकणकर यांना देण्यात आली होती.

आणखी संबंधित बातम्या

Dipali Sayyad : "मला रुपाली चाकणकर मेंटली टॉर्चर करत आहेत" ; अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

2026-08-25 14:44:42

Dipali Sayyad : "मला रुपाली चाकणकर मेंटली टॉर्चर करत आहेत" ; अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Rupali Chakankar : अखेर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटला, रुपाली चाकणकरांच्या जागी कोणाची निवड?

2026-08-05 13:12:59

Rupali Chakankar : अखेर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटला, रुपाली चाकणकरांच्या जागी कोणाची निवड?

Rupali Chakankar : 'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला'; सुनेत्रा पवारांवरील टीकेवर रुपाली चाकणकरांचा घणाघात

2026-08-05 12:30:44

Rupali Chakankar : 'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला'; सुनेत्रा पवारांवरील टीकेवर रुपाली चाकणकरांचा घणाघात

Shehzad Poonawalla Resignation : पंतप्रधानांचे कट्टर समर्थक शहजाद पूनावालांचा भाजपला रामराम? ; एक्स प्रोफाइलमधील बदलामुळे चर्चांना उधाण

2026-07-31 13:40:36

Shehzad Poonawalla Resignation : पंतप्रधानांचे कट्टर समर्थक शहजाद पूनावालांचा भाजपला रामराम? ; एक्स प्रोफाइलमधील बदलामुळे चर्चांना उधाण

Rupali Chakankar : 'अजूनही विश्वास बसत नाही...'; अजितदादांच्या जयंतीनिमित्त रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट

2026-07-22 10:55:22

Rupali Chakankar : 'अजूनही विश्वास बसत नाही...'; अजितदादांच्या जयंतीनिमित्त रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट