Rupali Chakankar : चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार? ‘ही’ 2 नावे चर्चेत

नाशिक येथील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि 'कॅप्टन' म्हणून ओळखले जाणारे भोंदू बाबा अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणाने राज्यातील (Rupali Chakankar) राजकीय वातावरण तापले आहे.

Updated On:
Rupali Chakankar : चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार? ‘ही’ 2 नावे चर्चेत

Rupali Chakankar : नाशिक येथील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखले जाणारे भोंदू बाबा अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण प्रकरणाने राज्यातील (Rupali Chakankar) राजकीय वातावरण तापले आहे.

खरात यांच्यावर १०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून, त्याच्या पेन ड्राइव्हमधून सापडलेल्या ५८ हून अधिक व्हिडिओ आणि फोटोंमुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.

हे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर गंभीर टीका झाली. खरातसोबतच्या जवळीक आणि धार्मिक कार्यक्रमांतील सहभागामुळे चाकणकर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

फेब्रुवारी महिन्यात एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर खरातला अटक झाली. त्यानंतर अनेक महिलांनी त्याच्याविरोधात आरोप केले. खरात स्वतःला भविष्यवेत्ता आणि माजी मर्चंट नेव्ही अधिकारी म्हणून सादर करत अंकशास्त्र, तंत्र-मंत्र आणि आध्यात्मिक नावाखाली महिलांचा शोषण करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ने तपास सुरू केला असून, खरातला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Vaishali Nagwade & Pratibha Shinde

Vaishali Nagwade & Pratibha Shinde

रुपाली चाकणकर, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या, त्यांच्यावर खरातच्या ट्रस्टमध्ये संचालक म्हणून असल्याचे आणि त्याच्यासोबत व्हायरल झालेल्या फोटो-व्हिडिओमुळे टीकेचा भडीमार झाला.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सादर केला. चाकणकर यांनी राजीनामा वैयक्तिक कारणांवरून दिल्याचे सांगितले, परंतु विरोधकांनी याला नैतिक जबाबदारीचे पाऊल म्हटले आहे.

महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहणार?
रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. या पदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून या पदासाठी दोन महिलांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

१. वैशाली नागवडे – पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय नेत्यांपैकी एक. त्या पक्षाच्या महिला विभागात महत्त्वाची भूमिका बजावतात. यापूर्वी वैशाली नागवडे यांना पक्षकार्यक्रमात मारहाण झाल्याच्या प्रकरणात महिला आयोगाने दखल घेतली होती.

२. प्रतिभा शिंदे – उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या नेत्यांपैकी एक. त्या महिलांच्या मुद्द्यांवर सक्रिय असल्याचे सांगितले जाते.

वैशाली नागवडे कोण आहेत? 
नागवडे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नेत्या आहेत. पवार कुटुंबीयांतील प्रत्येक नेत्यांशी त्यांचे घनिष्ट संबंध आहेत. त्यांनी पंचायत समितीचे सदस्य, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद, महानंदाचे अध्यक्षपद, पंचायतराज कमिटीचे अध्यक्षपद, प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. राष्ट्रवादीतील सर्वाधिक मदत करणाऱ्या पदाधिकारी म्हणून त्यांचे नाव चर्चेत राहिले आहे. महिला बचत गट, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

प्रतिभा शिंदे कोण आहेत?
प्रतिभा शिंदे या जळगावमधील राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. दरम्यान प्रतिभा शिंदे यांच्या प्रवेशावरून काही अजित पवार गटातील नेते नाराज होते. कारण त्यांची पार्श्वभूमीवर वादाची राहिली आहे.

या दोन्ही नावांवर राष्ट्रवादी पक्ष गंभीरपणे विचार करत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. सरकारकडून लवकरच नवीन नियुक्ती जाहीर होण्याची शक्यता आहे.

हे प्रकरण महिलांच्या सुरक्षितता आणि आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारे ठरले आहे. विरोधकांकडून चाकणकर यांच्यासह संबंधित नेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे, तर राष्ट्रवादीने प्रकरण गंभीर असल्याचे मान्य करत कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वर्तुळात या पदाच्या नवीन नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rupali Chakankar : ‘सर्वात आधी नानांचाच फोन आला'; रुपाली चाकणकरांनी सांगितली आठवण, भावुक पोस्ट केली शेअर

2026-10-08 11:03:31

Rupali Chakankar : ‘सर्वात आधी नानांचाच फोन आला'; रुपाली चाकणकरांनी सांगितली आठवण, भावुक पोस्ट केली शेअर

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

2026-10-06 08:43:04

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

2026-10-03 12:02:53

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

Harshwardhan Sapkal : राजीनामा द्या आणि प्रवक्ते म्हणून काम करा; फडणवीसांना हर्षवर्धन सपकाळ यांचा सल्ला

2026-09-27 21:15:47

Harshwardhan Sapkal : राजीनामा द्या आणि प्रवक्ते म्हणून काम करा; फडणवीसांना हर्षवर्धन सपकाळ यांचा सल्ला

Rohit Pawar : 3 कोटी मतदार वगळली जाऊ शकतात; एसआयआरवरून रोहित पवार यांचा दावा

2026-09-27 17:28:54

Rohit Pawar : 3 कोटी मतदार वगळली जाऊ शकतात; एसआयआरवरून रोहित पवार यांचा दावा