Devendra Fadnavis | बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. भाजपने 102 पैकी तब्बल ९० जागा जिंकल्या आहेत. तर, नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाला ८४ जागांवर विजय मिळाला. महाआघाडी निवडणुकीत सफशेल अपयशी ठरली. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मतचोरीच्या मुद्याचा कोणताही इफेक्ट बिहार निवडणुकीत दिसला नाही. यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. “जोपर्यंत राहुल गांधी अशाप्रकारे संवैधानिक संस्थांवर आरोप करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत अशीच राहिल. काँग्रेसची हालत एमआयएमपेक्षाही खाली गेली आहे,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान फडणवीस यांचा बिहार प्रचारसभेमधील एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत म्हंटले होते की, ही निवडणूक बिहारला विकास किंवा जंगलराज या दोन दिशांपैकी एकाकडे घेऊन जाईल. तर तेजस्वी यादव यांना टोला लगावताना ते म्हणाले की, “तेजस्वी यादव यांच्या लालटेनमध्ये आता तेल उरलेले नाही आणि बिहार चालवणे हे कोणत्याही लहान मुलांचे खेळ नाही. बिहारला आता वीज हवी आहे, लालटेन नाही,” असा टोला त्यांनी लगावला होता. तेजस्वी यांच्या पराभवामुळे फडणवीस यांची भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा सध्या सुरू आहे. Devendra Fadnavis | दरम्यान, काँग्रेसच्या पराभवावर फडणवीस यांनी भाष्य केले आहे. “राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवला आहे त्याला जनतेने उत्तर दिलं आहे. संवैधानिक संस्थांचा अपमान करणं. जनमताला विरोध दर्शवणं, जनतेला हे कळलं आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो त्या मतांचा अपमान राहुल गांधी करत आहेत. एकीकडे राजदची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेसची अवस्था आणखी वाईट आहे. काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी निकाल आला आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. बिहार निवडणुकीचा निकाल खरोखरच धक्कादायक – राहुल गांधी यां तर बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी निकाल खरोखरच धक्कादायक असल्याचे म्हंटले होते. “बिहारमधील कोट्यवधी मतदारांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी महागठबंधनावर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा आहे. बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक आहे. सुरुवातीपासूनच निष्पक्ष न राहिलेल्या निवडणुकीत आम्हाला विजय मिळवता आला नाही. ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाची आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी या निकालाचा सखोल अभ्यास करून लोकशाही वाचवण्याचे प्रयत्न आणखी प्रभावी करतील,” असे राहुल गांधी म्हणाले होते. हेही वाचा : जैश दहशतवादी मॉड्यूलविरुद्ध कडक कारवाई ; अनंतनागमध्ये छापा टाकत हरियाणातील महिला डॉक्टरला अटक