एक हजार खांबांचे काकतीय रुद्रेश्वर मंदिर आता जागतिक वारसा!

हैदराबाद – तब्बल एक हजार खांबांवर उभे असलेले तेलंगणामधील काकतीय रुद्रेश्वर मंदिराचा (रामप्पा मंदिर) युनेस्को जागतिक वारसा म्हणून समावेश झाला आहे. याची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली. ट्विट करत मोदींनी संपूर्ण देशवासियांना मनापासून शुभेच्छा दिल्या. त्यांनी तेलगंणाच्या नागरिकांचे विशेष कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी काकतीय रुद्रेश्वराच्या मंदिराला अधिकाधिक लोकांनी भेट द्यावी, असे आवाहन देखील केले.
तेलंगणामधील काकतीय रुद्रेश्वराच्या मंदिराल रामप्पा मंदिर असेही म्हटले जाते. मूर्तिपूजक रामप्पा यांचे ते नाव आहे. या मंदिराची भव्यता पर्यटकांना प्रेमात पाडते. अशा सुंदर वास्तुचे नाव आज युनेस्कोत जागतिक वारसा स्थळ म्हणून कोरण्यात आले आहे. याची माहिती युनेस्कोच्या अधिकृत ट्विटवरून देखील देण्यात आली.
रामप्पा मंदिर हे एकमेव असे मंदिर आहे ज्याचे नाव वास्तुविशारद रामाप्पा यांच्या नावाने ठेवण्यात आले आहे. इतिहासानुसार, काकतीय राजवंशाच्या राजाने 13 व्या शतकात हे मंदिर बांधले आहे. अनेक मंदिरे खचून तुटून गेली मात्र रामप्पा मंदिर चांगल्या स्थितीत आहे. आजवर अनेक आपत्ती येऊन गेल्या मात्र रामप्पा मंदिराचे विशेष कोणतेही नुकसान झालेले नाही.
या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला एक दोन नाही तर तब्बल एक हजार खांब आहेत. हे खांब या मंदिराचे खास आकर्षण आहे. हे मंदिर 13 व्या शतकातील अभियांत्रिकी चमत्कार मानला जातो. या मंदिराला जागतिक वारसा मिळावा यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि हा प्रस्ताव मंजूर होऊन रामाप्पा मंदिर जागतिक वारसा म्हणून ओळखले जाणार आहे.
Kakatiya Rudreshwara (Ramappa) Temple in Telangana has been inscribed as a UNESCO World Heritage Site
(Photo credit: UNESCO) pic.twitter.com/Ps15vP7p8t
— ANI (@ANI) July 25, 2021
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी देखील ट्विटकरत या प्रसंगी सर्वांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. युनेस्कोने रामप्पा मंदिरला जागतिक वारसा म्हणून घोषित केल्याने मला फार आनंद होत आहे. पंतप्रधान मोदी यांचे मार्गदर्शन आणि पाठिंब्यासाठी मी देशाच्या आणि विशेषत: तेलंगणाच्या जनतेच्यावतीने आभार मानतो, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.





