बुलढाणा : बुलढाणामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये विद्युत खांबाचा शॉक लागून 16 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोमल पहुरकर असे मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? विद्युत खांबात वीजेचा प्रवाह असल्याची माहिती वायरमनला कळवण्यात आली होती. मात्र त्याकडे वीज वितरण विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले. एमएसईबीने विद्युत खांबाची दुरुस्ती वेळेत न केल्याने कोमल पहुरकर या १६ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोमल पहुरकर हिच्या मृत्यूनंतर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून वायरमनवर कारवाई कऱण्याची मागणी केली आहे. तसेच मुलीच्या परिवाराला तात्काळ ५ लाख रु मदत करा, मुलीच्या परिवारातील एका व्यक्तीला महावितरण कार्यालयात शासकीय कर्मचारी म्हणुन घ्यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच 8 दिवसात हि मागणी मान्य न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकु असा इशारादेखील वंचितकडून देण्यात आला आहे.