‘पती पत्नी और पंगा’ शोमध्ये रुबिना दिलैक-अभिनव शुक्लाची जोडी ठरली विनर

Pati Patni Aur Panga | ‘पती पत्नी और पंगा’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा नुकताच अंतिम सोहळा पार पडला. या शोमध्ये अभिनेत्री रुबिना दिलैक आणि अभिनेता अभिनव शुक्ला ही जोडी विजयी झाली आहे. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये रुबीना आणि अभिनव यांना विजेतेपद मिळाले.
या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या जोडप्यांनी विविध गेम्स आणि टास्कमध्ये मजेशीररित्या सहभाग घेतला. या शोमध्ये सहभागी झालेल्या सर्व जोड्यांपैकी रुबिना आणि अभिनव ही या शोमधील चाहत्यांची सर्वाधिक आवडती जोडी ठरली. रुबिना आणि अभिनवला चांदीचे लाडू असलेली खास ट्रॉफी मिळाली. तर दूसरा क्रमांक गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी या जोडीने पटकावला.
रुबिना आणि अभिनव हे याआधी बिग बॉस १४ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. अभिनव या शोमधून लवकर बाहेर पडला होता, तर रुबिना या शोची विजेती ठरली होती. या जोडप्याने बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर ‘पती पत्नी और पंगा’मधूनही प्रेक्षकांची पुन्हा एकदा मने जिंकली. Pati Patni Aur Panga |
View this post on Instagram
‘पती पत्नी और पंगा’मध्ये गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी, स्वरा भास्कर आणि फहाद अहमद, रुबिना दिलैक व अभिनव शुक्ला, हिना खान व रॉकी जयस्वाल, सुदेश लहरी व ममता लहरी, गीता फोगाट व पवन कुमार, अविका गोर व मिलिंद चंदवानी, ईशा मालवीय व अभिषेक कुमार असे अनेक कलाकार सहभागी झाले होते. या शोचे सूत्रसंचालन मुनव्वर फारूकी आणि सोनाली बेंद्रे यांनी केले होते.
रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी जून २०२१ मध्ये लग्न केले आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांना जुळ्या मुली झाल्या. दोघेही जुळ्या मुली जीवा आणि एधा यांच्यासोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत.
हेही वाचा:
दिग्दर्शक राजामौलींचे भगवान हनुमानाबाबत विधान; नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल





