RSS on Aurangzeb Tomb । मागच्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून राज्यात रान उठले आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादमधील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केले. एवढेच नाही तर त्यासाठी अनेकांनी आंदोलने देखील केली. यावरूनच नागपुरात दंगल देखील उसळली. मात्र याच मुद्दावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका स्पष्ट करत मोठे विधान केले आहे. “औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक आहे. त्याचा मृत्यू इथे झाला, त्यामुळे त्याची कबर इथे बनली आहे. ज्याची श्रद्धा असेलत्याने तिथे जावं” असे मोठे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी केले आहे. पुढे बोलताना त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज आदर्श आहे, त्यांनी अफजल खानाची कबर बनवली होती. भारताच्या उदारतेच आणि सर्व समावेशकतेचे हे प्रतीक आहे. त्यामुळे औरंगजेबाची कबर आहे तिथे राहो आणि ज्याला जायचा आहे तो तिथे जाईल “असे स्पष्ट मतही भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे. संघाचा उत्तराधिकारीचा विषय नाही, ते परंपरेनुसार होईल RSS on Aurangzeb Tomb । पुढे त्यांनी पंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर भाष्य केले. पंतप्रधानाचा कालचा कार्यक्रम चांगला झाला. सेवे संदर्भात त्यांची रुची कोरोना काळात पाहिली. त्यांनी कोरोना काळात ऊर्जा प्रदान करण्याच काम केले. माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन त्याच्या हस्ते झाले, लवकरच तो प्रकल्प पूर्ण होईल. दरम्यान, संघाचा उत्तराधिकारीचा विषय नाही, ते परंपरेनुसार होईल.असेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी स्पष्ट केलं आहे. कबरीबाबत अनेक लोक तर्क लावत आहेत, पण.. RSS on Aurangzeb Tomb । औरंगजेबाच्या कबरीबाबत अनेक लोक तर्क लावत आहेत, औरंगजेब नगरला मेला, त्याची इच्छा होती इथं पुरावे म्हणून त्याला इथं आणले. त्यांना कुणी गाडलं वगैरे नाही, तो चुकीचा इतिहास आहे. आणि कबर नसावी याचे कारण म्हणजे त्यांनी शंभु राजांचे हाल केले म्हणून आहे. तो इतिहास आम्हाला पुसायचा आहे त्यात राजकारण नाही. असे मत शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. हेही वाचा “कुठल्याही परिस्थितीत औरंगजेबाच्या कबरीचं…”; राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या मुद्दयावर फडणवीसांंची प्रतिक्रिया