2 हजार रुपयांच्या 6,471 कोटी रुपयाच्या नोटा अजुनही जनतेकडेच

मुंबई – रिझर्व बँकेने शनिवरी सांगितले कि, 2,000 रुपयांच्या 98.18 टक्के नोटा बँकींग प्रणालीत परत आल्या आहेत. उरलेल्या 6,471 कोटी रुपयाच्या नोटा अजुनही जनतेकडे आहेत. 19 मे 2023 रोजी आरबीआयने 2,000 च्या नोटा चलानातून काढून टाकण्याची घोषणा केली होती.
“19 मे 2023 रोजी व्यवहार बंद होताना 2,000 रुपयांच्या नोटांचे मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होते ते आता 28 फेब्रुवारी 2025 रोजी व्यवहार बंद होताना 6,471 कोटी रुपये आहे” असे आरबीआयने सांगितले.
2,000 च्या नोटा जमा करण्याची सुविधा 9 आॉक्टोबर 2023 पर्यंत बँकांच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध होती. मात्र अजुनही रिझर्व्ह बँकेच्या 19 शाखांमध्ये हि सुविधा उपलब्ध आहे. ज्यांनी अजुनही 2,000 च्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा केल्या नाहीत, ते भारतीय पोस्टाच्या देशातल्या कोणत्याही पोस्टाद्वारे 19 रिझर्व्ह बँकेच्या शाखांमधील कोणत्याही शाखेत पाठवू शकतात.



