Ayushman Bharat : आयुष्यमान भारत योजनेवर 51 हजार 749 कोटींचा खर्च

नवी दिल्ली – देशातीाल 23.07 कोटी लोकांना केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत विमा योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत यावर्षी 2 फेब्रुवारीपर्यंत एकूण 4.34 कोटी रूग्णांना रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले असून त्यावर 51,749 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली.
या योजनेअंतर्गत सरासरी दरडोई खर्च 11,924 रुपये इतका आहे, असे मांडविया यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना सप्टेंबर 2018 मध्ये सुरू करण्यात आली, या योजनेत हॉस्पिटलायझेशनसाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/upinvestorssummit-the-state-of-uttar-pradesh-is-now-known-for-good-governance-pm-modi/
या योजनेत खासगी रूग्णालयांनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यांच्या इच्छेनुसार ही रूग्णालये अर्ज करू शकतात आणि निकषांच्या पुर्ततेनंतर त्यांना या रूग्णालयांच्या पॅनेल मध्ये समाविष्ट करून घेतले जाते अशी माहितीही यावेळी देण्यात आली.




