लाजिरवाणा प्रकार ! करोनाबाधिताच्या मृत्यूनंतर खिशातून चोरले 35 हजार रुपये; व्हिडीओ व्हायरल

धुळे – राज्यात करोनाने कहर माजवला आहे. अनेकांना आरोग्य सुविधांअभावी जीव गमवावा लागत आहे. तर काही ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहे. डॉक्टर जीवाची बाजी लावून रुग्णांना वाचव आहे. तर काही ठिकाणी रुग्णांना लुटण्याचे प्रकार समोर येत आहे. धुळ्यातून असाच प्रकार समोर आला असून येथे करोनाबाधिताच्या मृत्यूनंतर त्याच्या खिशातून पैसे काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना धुळ्यातील श्री गणेश मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमधली आहे.

एका कोरोना संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्याला प्लास्टिकच्या बॅगेत पॅक करण्यात आले होते. यानंतर, येथील 4 आरोग्य कर्मचाऱ्यांनी ती बॅग उघढून त्या मृतदेहाच्या खिशातून 35 हजार रुपये चोरले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चौघांना निलंबित करण्यात आले आहे.

मृतदेह कुटुंबियांकडे दिल्यानंतर कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनाला रुग्णाच्या खिशात असलेल्या पैशांबद्दल विचारणा केली. रुग्णालय प्रशासनाला काही माहित नव्हतं. मात्र रुग्णालयाचे सीसीटीव्ही चेक करण्यात आले आणि त्यात हा प्रकार उघडीस आला. वास्तविक पाहता, एकदा बॅगेत पॅक केलेला करोनाबाधिताचा मृतदेह उघडता येत नाही. पण, आरोपींनी तो मृतदेह स्टोअर रुममध्ये नेला आणि खिशातून पैसे चोरले. हा सर्व प्रकार त्या खोलीतील सीसीटीव्हत कैद झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.