RR vs LSG : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील ६४ वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (RR vs LSG ) यांच्यात पार पडला. या सामन्यात राजस्थानने लखनऊवर ७ विकेट्सने विजय मिळवला. प्लेऑफसाठी गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या 3 संघांनी प्लेऑफचं तिकीट मिळवलं. त्यामुळे उर्वरित 1 जागेसाठी 5 संघांत चुरस आहे. मात्र राजस्थानने आज लखनऊवर (RR vs LSG ) विजय मिळवल्याने त्यांनी प्लेऑफच्या दिशेने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. राजस्थानच्या या विजयामुळे चेन्नई, पंजाब किंग्स, कोलकाता आणि दिल्लीच्या संघासमोरील अडचणी वाढल्या आहेत. या सामन्याबद्दल (RR vs LSG ) बोलायचे झाल्यास राजस्थानने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत लखनऊला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. लखनऊ सुपर जायंट्सच्या सलामी जोडीने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात तोडफोड बॅटिंग केलीय. दोघांनी 50 बॉलमध्ये 109 रन्सची पार्टनरशीप केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावलं. जोशने 29 बॉलमध्ये 60 रन्स केल्या. जोशने या खेळीत 3 सिक्स आणि 7 फोर लगावले. तर मिचेल मार्श याचं शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. मार्शने लखनौसाठी सर्वाधिक धावा केल्या. मार्शने 57 बॉलमध्ये 96 रन्स केल्या. मार्शने या दरम्यान 5 सिक्स आणि 11 फोर ठोकले. तर राजस्थानसाठी यश राज पुंजा याने 2 विकेट्स मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर याने 1 विकेट मिळवली. RR vs LSG जोश इंग्लिस आणि मिचेल मार्श या सलामी जोडीने केलेल्या स्फोटक बॅटिंगच्या जोरावर लखनऊने राजस्थानसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लखनऊने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 220 धावा केल्या. या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानने देखील आपल्या फॉर्मला साजेशी अशी खेळी केली. युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांनी सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करत संघाच्या विजयचा पाया रचला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी केली. यशस्वी जयस्वाल ४३ धावांवर बाद झाल्यावर वैभवने संघाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेत लखनऊच्या गोलंदाजांना सळो कि पळो करून सोडलं. वैभवचे अवघ्या ७ धावांनी शतक हुकलं. त्याने २४४ स्ट्राईक रेटने ३८ चेंडूत ९३ धावा केल्या. यामध्ये ७ चौकार आणि १० षटकारांचा समावेश आहे. त्याला ध्रुव जुरेल याने उत्तम साथ दिली. ध्रुव जुरेलने आपल्या खेळीत नाबाद ५३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ३ षटकार लगावले. तर लखनऊकडून (RR vs LSG ) आकाश सिंग आणि मोहसीन खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.