Roshni Walia | ‘भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप’ आणि ‘तारा फ्रॉम सितारा’ सारख्या लोकप्रिय कार्यक्रमात भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्री रोशनी वालियाचा अपघात झाला आहे. या अपघाताबाबतची माहिती स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली आहे. तसेच, सध्या खूप वेदना होत असल्याचे तिने सांगितले. अभिनेत्रीने इंस्टा व्हिडिओमध्ये अपघातामुळे झालेली जखम देखील दाखवली आहे. याशिवाय तिने आरोग्याबद्दल माहिती दिली. रोशनी वालियाने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, हॅलो, एक छोटीशी अपडेट आहे. मी सध्या खूप वेदना सहन करत आहे. मला माहित आहे की तुमच्यापैकी अनेकजण विचारत आहे की हे वण कसे आले? माझा ड्रेस बाईकच्या टायर आणि चेनमध्ये अडकला होता. त्यानंतर ड्रेस माझ्या पायात अडकून फाटला. हा खरोखरच माझ्यासाठी एक भयानक अनुभव होता.’ अभिनेत्रीने इतरांनाही अशाप्रकारचा अपघात टाळण्यासाठी काय करायला हवे, याबाबत माहिती दिली. तिने लिहिले की, ‘कृपया बाइकवरुन प्रवास करताना लूझ कपडे घालू नका. मला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे. परंतु, मी भाग्यवान आहे की यापेक्षा भयानक काही घडले नाही. माझ्या तब्येतीची चौकशी केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. काळजी घ्या.’ यासोबतच, तिने इंस्टाग्रामवर मांडीला झालेल्या जखमेचा फोटोही शेअर केला. रोशनी वालियाच्या कामाबद्दल सांगायचे तर तिने ‘मैं लक्ष्मी तेरे अंगने की’, ‘देवों के देव महादेव’, ‘भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप’, ‘ये वादा रहा’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. ती लवकरच अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘सन ऑफ सरदार’ च्या सिक्वलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटातमध्ये अजयसोबत मृणाल ठाकुर मुख्य भूमिकेत आहे.