Rose For Skin: गुलाब हे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. पण फक्त सुगंध आणि सजावटीपुरतेच नाही, तर त्वचेच्या आरोग्यासाठीही गुलाब खूप फायदेशीर आहे. प्राचीन काळापासून स्किन केअरमध्ये गुलाबाचा वापर केला जातो. हा एक नैसर्गिक घटक असून तो त्वचेला कोणतीही हानी न पोहोचवता तिची गुणवत्ता सुधारतो. उन्हाळ्यात त्वचा कोरडी, थकलेली आणि निस्तेज दिसू लागते. अशा वेळी गुलाबाचा योग्य वापर केल्यास त्वचेला ताजेपणा आणि नैसर्गिक चमक मिळू शकते. तज्ज्ञांच्या मते, गुलाबात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवरील सूज कमी होण्यास मदत होते. तसेच सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होणाऱ्या त्वचेच्या नुकसानापासूनही काही प्रमाणात संरक्षण मिळते. डार्क सर्कल्स, पिंपल्स, डाग-धब्बे आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी गुलाब उपयुक्त ठरतो. चला तर मग, त्वचेसाठी गुलाबाचे पाच सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेऊया. १) गुलाब टोनर म्हणून वापरा (Rose For Skin) बाजारात मिळणारे गुलाबजल तुम्ही थेट टोनर म्हणून वापरू शकता. किंवा घरीच देशी गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात उकळून ते पाणी गार करून स्प्रे बाटलीत भरावे. चेहऱ्यावर दिवसातून दोनदा स्प्रे करा. यामुळे त्वचेचा पीएच संतुलित राहतो आणि त्वचा फ्रेश व तेजस्वी दिसते. Rose Water Toner: Benefits & How to Use for Glowing Skin २) डोळ्यांखालील सूज आणि काळी वर्तुळे कमी करा (Rose For Skin) गुलाबाच्या रसात कापसाचे पॅड भिजवून ते डोळ्यांवर १० मिनिटे ठेवा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो, थकवा कमी होतो आणि डार्क सर्कल्स हळूहळू कमी होण्यास मदत होते. ३) फेस पॅक म्हणून वापर गुलाबाच्या पाकळ्या वाटून त्यात चंदन पावडर, संत्र्याच्या सालीची पावडर आणि थोडी मुलतानी माती मिसळा. आवश्यक असल्यास गुलाबजल घालून पेस्ट तयार करा. हा पॅक २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा तजेलदार दिसते आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते. ४) गुलाब आणि कच्चे दूध गुलाबाच्या स्वच्छ धुतलेल्या पाकळ्यांमध्ये थोडे कच्चे दूध घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा. कोरडी त्वचा मऊ होते आणि डाग-धब्बे कमी होण्यास मदत मिळते. ५) गुलाब स्क्रब गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये लिंबूरस, मध आणि ब्राऊन साखर मिसळा. त्यात थोडे कोरफड जेल घालून हलक्या हाताने चेहऱ्यावर गोलाकार हालचालीत मसाज करा. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि रंगत उजळते. गुलाबाचा नियमित आणि योग्य वापर केल्यास त्वचा नैसर्गिकरीत्या सुंदर आणि निरोगी राहू शकते. मात्र कोणताही नवीन उपाय करण्यापूर्वी त्वचेवर छोटा पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.