Turkey-Syria : रोमिओ आणि ज्युली! भारतीय बचाव पथकातील दोन खास हिरो; वाचवले अनेकांचे प्राण

नूरदगी – तुर्कीये आणि सीरियामध्ये आलेल्या भीषण भूकंपानंतर त्या ठिकाणी भारतीय लष्कराचे पथक मदत व सुटका कार्यासाठी गेले आहे. आत्तापर्यंत या पथकाने तसेच अन्य देशातून आलेल्या पथकांनी व स्थानिक यंत्रणांनी वेगाने मदत कार्य चालू ठेवले असले तरी या महाभयंकर संकटात 40 हजाराहून अधिक लोकांचे बळी गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, तीन दिवस मातीच्या ढिगार्याखाली अडकलेल्या सहा वर्षांच्या मुलीला इमारतीच्या राडारोड्यातून जिवंतपणे बाहेर काढण्यात आले आहे. त्यामध्ये भारतीय मदत व सुटका कार्याच्या पथकातील दोन खास हिरोंचा मोलाचा सहभाग आहे. रोमिओ आणि जुली अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे नसते तर कदाचित मातीच्या ढिगार्याखाली अडकलेल्या सहा वर्षाच्या मुलीचा कुणालाच पत्ता लागला नसता.
कोसळलेल्या इमारतींच्या ढिगार्याखाली शोध घेण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा वापरली जात असली तरी अनेकदा या यंत्रणेच्या मर्यादा ज्या ठिकाणी संपतात, त्या ठिकाणी रोमियो-जुली यांचे काम सुरू होते.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/anonymous-pakistani-businessman-gives-30mn-to-support-quake-relief-in-turkey-syria/
ही दोन भारतीय पथकातील स्निफर डॉग्स आहेत आणि ढिगार्याखाली अडकलेल्यांना शोधून त्यांना बाहेर काढण्यात या दोन्ही कुत्र्यांची मोलाची मदत होत आहे.

