Rohit Sharma : रोहित शर्माने केली श्रेयस अय्यरची हुबेहूब नक्कल; तिचं स्टाईल आणि तिचं टशन…व्हिडिओ व्हायरल

जयपूर : काल मुंबई इंडियन्स (Rohit Sharma) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल 2025 मधील 69 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने विजयासाठी दिलेलं 185 धावांचं आव्हान पंजाब किंग्सने 7 विकेट राखून पूर्ण केलं. या विजयाबरोबर पंजाब किंग्सने पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं. तर दुसरीकडे मुंबईला चौथ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं.
रोहित शर्माने केली श्रेयसची नक्कल
रोहित शर्मा (Rohit Sharma) हा अनेकदा मैदानात सह खेळाडूंच्या खोड्या काढताना दिसतो. पंजाब – मुंबई सामना संपल्यावर रोहितने पंजाबचा कर्णधार श्रेयसची हुबेहूब नक्कल केली. रोहित श्रेयस प्रमाणे छाती फुगवून, हात हलवत आला आणि त्याने श्रेयस अय्यरला मिठी मारली. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. यावेळी मुंबईने 20 षटकांत 7 विकेट गमावून 184 धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या पंजाबने 18.3 मध्ये 187 धावा करून मुंबईवर मात केली. या विजयासह पंजाब किंग्सने पॉईंट्स टेंबलमध्ये टॉप -2 मधील स्थान पक्के केले. टॉप -2 मध्ये स्थान मिळवण्याचा फायदा असा कि ते क्वालिफायर 1 सामना खेळले, यात ते पराभूत झाल्यास त्यांना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अजून एक संधी मिळेल.
गुजरात कि आरसीबी?
पंजाबच्या संघाने टॉप – 2 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आज आरसीबी आणि लखनऊ यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात जर आरसीबीने विजय मिळवला तर ते टॉप -2 मध्ये पोहोचतील आणि जर त्यांचा लखनऊ कडून पराभव झाला तर गुजरातचा संघ टॉप -2 मध्ये पोहोचेल. त्यामुळे या सामन्यानंतर टॉप – 2 मध्ये स्थान मिळवणारा दुसरा संघ निश्चित होईल.





