“रोहित शर्मा ‘लठ्ठ’, आतापर्यंतचा सर्वात वाईट कर्णधार”; कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची पोस्ट; भाजपने साधला निशाणा

Rohit Sharma | काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसवर भाष्य केल्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा ‘लठ्ठ’ आहे. त्याने वजन कमी करण्याची गरज आहे अशी टिप्पणी करतानाच शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी रोहितच्या कर्णधारपदाला अप्रभावी म्हटले आहे.
वाद निर्माण झाल्यानंतर आपण हे सामान्यपणे म्हटले असल्याचे सांगत शमा यांनी आपल्या विधानाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असला तरी भारतीय जनता पार्टीने या मुद्द्यावरून कॉंग्रेस पक्षाला लक्ष्य केले आहे. त्याच वेळी, काँग्रेसने शमा मोहम्मद यांच्या विधानापासून स्वतःला दूर ठेवले आहे. Rohit Sharma |
काँग्रेसचे मीडिया प्रभारी आणि प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी एका दिग्गज क्रिकेटपटूबद्दल काही विधाने केली आहेत जी पक्षाच्या भूमिकेशी जुळत नाहीत. काँग्रेस पक्ष खेळाडूंच्या योगदानाला खूप महत्त्व देतो आणि त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकेल अशा कोणत्याही विधानांचे समर्थन करत नाही. त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ते ट्विट डिलीट करण्यास सांगण्यात आले आहे आणि भविष्यात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Rohit Sharma |
शमा मोहम्मद यांच्या विधानावरून भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही काँग्रेसला चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ९० निवडणुका हरलेले लोक रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसला दिल्लीत सहा वेळा पराभव पत्करावा लागला आहे. कॉंग्रेसने स्वत:ची काळजी घ्यावी आणि त्यांच्या कर्णधाराची काळजी घ्यावी.”
काय म्हणाल्या होत्या शमा मोहम्मद?
शमा मोहम्मद यांनी म्हटले होते, “रोहित शर्मा खेळाडू म्हणून खूप लठ्ठ असून त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. तसेच तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात वाईट कर्णधार आहे.” दरम्यान, रोहित शर्मावरील पोस्ट नंतर वाद निर्माण झाल्यानंतर शमा मोहम्मद यांनी पोस्ट डिलीट केली आहे. त्यानंतर त्यांनी ‘माझी पोस्ट अतिशय सामान्य होती. खेळाडूने फिट राहणे आवश्यक आहे. मला रोहित शर्मा थोडा लठ्ठ वाटला त्यामुळे मी ती पोस्ट टाकली होती. यावर विनाकारण वाद निर्माण केला असल्याचे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली होती.
हेही वाचा:
“पुतिन आपल्यासाठी आवश्यक नाहीत” ; रशियासोबतच्या वाढत्या जवळीकतेवरील टीकेवर ट्रम्प यांचे उत्तर





